ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंजाब नॅशनल बँकेला पाच हजार कोटींचा तोटा

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) - बॅंकिंगच्या इतिहासात पंजाब नॅशनल बॅंकेला सर्वात‍ मोठा तोटा सहन करावा लागला आहे. जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत बॅंकेला तब्बल 5 हजार 367 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची माहिती आहे.
 
मागील वर्षी याच तिमाहीत बॅंकेला 306 कोटी रुपयांचा नफा झाला होता. थकित कर्जांचं प्रमाण आवाक्याबाहेर गेल्यामुळे बॅंकेला तोटा सहन करावा लागला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बॅंकेला तोटा झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 

गेल्या आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीत बॅंकेला 306.56 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सध्या बँकेच्या उत्पन्नामध्ये 1.33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचवेळी बॅंकेच्या थकित कर्जांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या थकित कर्जांचा आकडा 10 हजार 485.23 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

सिंडिकेट बँकेला २१५८ कोटींचा तोटा
सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने चौथ्या तिमाहिचे आकेडे जाहीर केले आहेत. या बँकेला २१५८.१७ कोटींचा तोटा झाला आहे. बुडीत कर्ज व आकस्मिक निधीच्या तरतुदींमुळे बँकेला हा तोटा झाला आहे.