ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मातोश्रीवर थडकली सैराटची टीम! उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक

मुंबई, दि. 19(प्रतिनिधी)- महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवणार्‍या ’सैराट’ च्या टीमने गुरुवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी गणपतीची प्रतिमा देऊन ’सैराट’च्या टीमचे कौतुक केले.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख, अनुजा मुळे यांच्यासह ’सैराट’चे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट’ सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. नागराज मंजुळेंसह आर्ची-परशा साकारणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर तमाम रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या कौतुकाची थापही त्यांच्या पाठीवर पडली आहे. दुपारी एकच्या सुमारास सैराटची टीम मातोश्रीवर पोहोचली होती.