ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंकू, आकाशला पाच कोटींचा बोनस मिळणार?

मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी)- नागराज मंजुळेंच्या ’सैराट’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. या सिनेमाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावून आत्तापर्यंत 60 कोटींहून अधिकचा गल्ला जमवून मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला आहे. सिनेमातील कलावंत रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनाही चक्क 5 कोटी रुपयांचा बोनस मिळणार असल्याचं वृत्त आहे. मुंबई मिररमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झालंय. याविषयी झी स्टुडिओने मात्र अधिकृत घोषणा केलेली नाही.
बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे झी स्टुडिओतर्फे सांगण्यात आले. आत्तापर्यंत 60 कोटींहून अधिकचा गल्ला ’सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर अफवांचा बाजार रंगत आहे. यापूर्वी सोशल मीडियावर बातमी पसरली होती, की नागराज मंजुळे रिंकू आणि आकाशला प्रत्येकी एक कोटी रुपये तर तानाजी आणि अरबार यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देणार आहेत. आता ’मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार मात्र रिंकू आणि आकाश कोट्यधीश होणार आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला कोणत्याही सिनेमासाठी एवढं मानधन मिळालं नव्हतं. त्यामुळे हे वृत्त खरं ठरल्यास रिंकू आणि आकाशसाठी हा बंपर बोनस ठरणार आहे.