ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोशल मीडियाचा वापर करुन ग्रंथालयांनी लोकाभिमुख व्हावे - विनोद तावडे

मुंबई,दि. 23 (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढत असताना वाचकांची संख्यासुद्धा वाढत आहे. जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच, सोशल मीडियाचा वापर करुन अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे. तरुणांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्याचे महत्त्वाचे कार्य ग्रंथालयांनी करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या सन 2013-14 साठीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच  डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ वितरण सोहळ्यात तावडे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उप सचिव पा.म. ताकटे, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते.
ग्रंथालय संचालनालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण तसेच राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पुरस्कारप्राप्त ग्रंथालयांच्या वतीने शिव शर्मा तर पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या वतीने रमेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय उपसंचालक सु. हि. राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पुरस्कारप्राप्त ग्रंथालयांचे संचालक, ग्रंथमित्र, त्यांचे कुटुंबीय तसेच ग्रंथालय संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रंथालय संचालनायाच्या वतीने सन 2013-14 साठी खालीलप्रमाणे पुरस्कार वितरित करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ शहरी विभागासाठी - (1) श्री.शारदा वाचनालय, गोंदिया (2) श्री.विठ्ठलनाथ संस्थान संचलित गीता ग्रंथालय, विरार, (3) कै.सौ.मंगला रघुनाथ केडगे वाचनालय, सांगली (4) डॉ.शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर.
ग्रामीण विभागासाठी - (1) शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, जि.सांगली (2) विकास वाचनालय, लोणी,जि.पुणे (3) श्री.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, शिवपूर, लातूर (4) कै.लक्ष्मणराव शामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय, टोकवाडी,जि.बीड. डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’- (राज्यस्तर) कार्यकर्ता (राम हनमंतराव देशपांडे, अमरावती) सेवक (आत्माराम बाबुराव कांबळे, लातूर) 
विभाग स्तरावरील कार्यकर्ता - (1) अमरावती - अरूणा सदाशिव कुल्ली, बुलढाणा (2) औरंगाबाद - देवीदास भगवानराव देशपांडे, औरंगाबाद (3)नागपूर-डॉ.श्रावण किसनजी उके, गोंदिया (4) नाशिक- सतिश उत्तमराव पाटील, धुळे (5) पुणे- रमेश धोंडिबा सुतार, पुणे (6) मुंबई- नागेश मधुकर कुलकर्णी, अलिबाग (रायगड)