ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदी

झिंम्बाब्वे, इंडीज दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी)- झिंम्बाब्वे दौर्‍यासाठी टीम इंडियाची सोमवारी मुंबईत निवड करण्यात आली. वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी कर्णधार म्हणून विराट कोहली असेल तर उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली.
निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत झिंम्बाब्वे व वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा नवनिर्वाचित सचिव अजय शिर्के यांनी केली. यावेळी संदीप पाटील उपस्थित होते. येत्या 11 जूनपासून भारतीय संघाचा झिंम्बाब्वे दौरा सुरु होत असून, तेथे भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने तर तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. भारतीय संघ जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौर्‍यावर जात असून तेथे चार कसोटी सामने खेळणार आहे. या दौर्‍यावर जाणार्‍या कसोटी संघाचीही यावेळी घोषणा करण्यात आली.
दरम्यान, भारतीय संघाला पूर्णवेळ प्रशिक्षक हवा असून, त्याची प्रक्रिया बीसीसीआयने सुरु केली आहे. या निवडीसाठी बीसीसीआयने जाहीरात प्रसिद्ध केली आहे. मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक यासोबतच सपोर्ट स्टाफ’साठी बीसीसीआयने जाहिरात दिली आहे. यासाठी 10 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन बीसीसीआयने केले आहे.
झिंम्बाब्वे दौर्‍यासाठी संघ याप्रमाणे असेल: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केएल राहुल, फैज फजल, मनिष पांडे, करूण नायर, अंबाती रायडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, वरिंदर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव अनाडकट, युजेवेंद्र चहल, जसप्रित बुमराह.
वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी असा आहे कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, वृद्धीमान साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, महमंद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर, स्ट्अर्ट बिन्नी, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर.