ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

यवतमाळ नगरपरिषदेमध्ये अमृत योजनेच्या अंमलबजावणीस लवकरच मान्यता - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी)- केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेची यवतमाळ नगरपरिषदेमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यवतमाळ नगरपरिषदेमध्ये अमृत योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस यवतमाळचे आमदार मदन येरावार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमृत योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून यामध्ये केंद्र शासनामार्फत 50, राज्य शासनामार्फत 25 आणि नगरपरिषदेमार्फत 25 टक्के वाटा उचलण्यात येतो. यवतमाळ नगरपरिषदेमार्फत 55 कोटी रुपयांचे काम केले जाणार असून या कामाला प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येईल. आज यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषदेत नवीन गावांचा समावेश झाला आहे. या गावांचा अमृत योजनेत समावेश नसल्याने या गावातील पाण्याच्या वाटपाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या योजनेअतंर्गत नदीतील गाळ काढणे, पाण्याचे शुध्दीकरण आणि पाण्याचे समान वाटप याकडेही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अमृत योजनेतील पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यासाठी बेंबळा उद्भवावरुन पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार करावा. त्यासाठी लागणार्‍या 208 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद कशाप्रकारे करता येईल, याचा अभ्यास करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
यवतमाळ येथील टीबी हॉस्पिटलच्या प्रश्नासंदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस यवतमाळचे आमदार मदन येरावार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह यवतमाळ येथील नगर परिषद आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ शहराच्या विकास आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे सध्याची टीबी हॉस्पिटलची जागा यवतमाळ नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात यावी,असे निर्देश याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.