ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गुरुवारपासून दुबईकर अनुभवणार सैराटची झिंग!

मुंबई, दि. 25 (प्रतिनिधी)- अख्ख्या महाराष्ट्राला याड लावलेल्या सैराटची झिंग गुरुवारपासून दुबईत अनुभवायला मिळणार आहे. सैराट गुरुवारपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये प्रदर्शित होणार आहे.त्यासाठी बुधवारी दुपारी 2 वाजता सैराटची टीम दुबईत पोहोचली.
दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर हे बुधवारी दुपारी दुबईत पोहोचले. कर्मा इव्हेंटच्या संचालिका करुणा शरद, दीपा भारथ, शरद सोनोने यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत स्वागत केले. यएईमधील मराठी भाषिकांना हा चित्रपट पाहता यावा, यासाठी दुबईतील कर्मा इव्हेंट्सने पुढाकार घेतला. दुबई आणि अबुधाबीच्या सिनेमागृहात हा चित्रपट झळकणार असल्याची माहिती कर्मा इव्हेंटच्या संचालिका करुणा शरद आणि दीपा भारथ यांनी दिली.
26 मे रोजी दुबई येथे या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. या सोहळ्याला दिग्दर्शन नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थतिी राहणार आहे. 27 मेला सायंकाळी सैराट टीमच्या उपस्थति दुबईमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर दुबईत असलेल्या भारतीयांना सैराट टीमसोबत गाला डीनरचे आयोजन केले आहे.
यूएईमध्ये व्यवसाय, नोकरीनिमित्त स्थायिक झालेले अनेक मराठी भाषिक आहेत. सैराट’च्या अभुतपूर्व यशाच्या बातम्या वाचून ते भारावून गेले. त्यामुळेच खास मराठी भाषिकांच्या आग्रहामुळे कर्मा इव्हेंट कंपनीने वॉक सिनेमा सोबत करार करून हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. मराठी प्रेक्षकांची मर्यादित संख्या पाहता या चित्रपटाला 26 ते 28 मेपर्यंत 23 शो मिळाले आहेत. चित्रपटाच्या प्रतिसादावर या तीन दिवसानंतर शो वाढवले जाणार आहेत.