ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नवी मुंबई विमानतळ परिसरातील नागरिकांचे सिडकोने पुनर्वसन करावे - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी)- नवी मुंबई विमानतळ परिसरातील नागरिकांचे सिडकोने पुनर्वसन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकार्‍यांना दिले.
विमानतळासाठी जागा देणार्‍या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, लोक राहत असलेल्या परिसरातील जागांचे योग्य मोजमाप करुन मोबदला द्यावा. येत्या दीड वर्षात पाणी, वीज, रस्ते, शाळा, आदी सुविधा मिळतील याकडे सिडकोने लक्ष द्यावे. सिडकोने चांगले पॅकेज दिले आहे. नागरिकांची कामे अडवू नयेत. आंदोलन करु नये, सर्वांनी कायद्याचे पालन करावे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात. नवी मुंबई विमानतळ झाल्यावर या भागाचा मोठा विकास होणार असून सर्वांनी शासन आणि सिडकोला सहकार्य करावे.
प्रारंभी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले, जवळपास साडेतीन हजार नागरिकांचे स्थलांतर करायचे असून त्यांना तीन वेगवेगळे पॅकेज पर्याय दिले आहेत. दीड वर्षात त्यांना घरे मिळतील. सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्यास सिडको कटिबद्ध आहे. या बैठकीत उपस्थित आमदार व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, व्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे उपस्थित होते.