ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज्याचे परिवहन धोरण तातडीने तयार करा - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी)- परिवहनविषयक विविध समस्या, अडचणी आणि तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करण्यात यावी आणि राज्याचे परिवहन धोरण तातडीने तयार करण्यात यावे, असे निर्देश बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री विजय देशमुख, आमदार शोभाताई फडणवीस, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के.जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र राज्य ट्रक बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात ट्रक टर्मिनल, बस टर्मिनल उभारण्याबाबत खासगी सार्वजनिक सहभागातून (पीपीपी) तत्त्वावर विचार करता येईल, यासंदर्भात निश्चित धोरण तयार करण्यात येईल. किमान महामार्गांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरु केले जाईल. राज्यातील सीमा तपासणी नाक्यावरील वापरात नसलेल्या खोल्यांचा वापर ट्रॉमा केअर सेंटर किंवा इतर माध्यमातून करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सीमा तपासणी नाक्यावरील अवैध वसुली रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन अधिकार्‍यांना दिले.