ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या १३

प्रोबेस कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) - डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तेरावर पोहचली आहे. स्फोटात जमीनदोस्त झालेल्या प्रोबेस एन्टप्रायसेस कंपनीच्या आवारातील ढिगारे उपसण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे सुरू आहे. वायुगळतीचा धोका असल्याने अतिशय काळजीपूर्वक हे काम सुरू आहे.

स्फोटानंतर काही कामगारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने त्यांचे नातावाईक ढिगारे उपसले जात असलेल्या ठिकाणी बसून आहेत. प्रोबेसचे डॉ. विश्वास वाकटकर यांची दोन्ही उच्चशिक्षित मुले नंदन (३२) व सुमीत (३०) आणि सून स्नेहल (२८) यांचाही मृत्यू या स्फोटात झाला आहे. या स्फोटावरून प्रोबेसच्या व्यवस्थापनावर शुक्रवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

स्फोटात गुरुवारी सापडलेल्या एका मृताची ओळख पटली नव्हती. तो मृतदेह सुमीत वाकटकर यांचा असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. इमारतीच्या गच्चीत शुक्रवारी आढळलेला मृतदेह हा त्यांची पत्नी स्नेहल यांचा असल्याची ओळख पटली असून स्फोटात उडून त्या गच्चीवर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या स्फोटात २०१ जण जखमी झाले आहेत. त्यातील ४७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून १५४ जखमींना उपचारानंतर शुक्रवारी घरी जाऊ देण्यात आले. चौदा रुग्णांवर एम्स, शिवम आणि नेपच्युन रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या नुकसानीला जबाबदार धरून प्रोबेस कंपनीचे सुमीत वाकटकर यांच्यावर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक विक्रम काटमवार यांनी शुक्रवारी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

कंपनीतील निष्काळजीपणा, गंभीर दुखापत, आर्थिक हानीचा ठपका सुमीत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रोबेस कंपनी आवारातील ढिगारे उपसणे व मदतकार्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम गुरुवारी संध्याकाळपासून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत ८९३ रहिवाशांच्या घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.