ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्राण्यांबद्दल करुणाभाव दाखवणे हे नागरिकांचे कर्तव्य - न्या. धर्माधिकारी

मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी)- प्राण्यांबद्दल करुणाभाव दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा हे महत्त्वाचे पाऊल असून वेगवेगळ्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीच्या वतीने मंत्रालयात मानद प्राणी कल्याण अधिकारी यांच्या प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमात धर्माधिकारी बोलत होते. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गृह विभाग, परिवहन विभाग, महानगरपालिका, प्राणीमित्र संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
न्या.धर्माधिकारी म्हणाले, आज काऊ-चिमणीची गोष्ट संपली आहे. जगात किती पक्षी संपले याचा हिशोब नाही. निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला कोणती ना कोणती भूमिका दिलेली आहे. प्राण्यांचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सुरक्षा ही प्राण्यांची असो किंवा मनुष्याची असो ती सेवेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून प्राण्यांचे रक्षण सेवाभावी वृत्तीने करणे अपेक्षित आहे.
प्राण्यांचे संरक्षण करण्यात महिलांचाही पुढाकार आहे. महिला यासाठी सक्षमपणे काम करीत आहेत. सर्व प्राण्यांना जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यांना आपल्या जीवनात स्थान द्यावे, यासाठी कायदे करुन उपयोग नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी समाजामध्ये प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे बिजय कुमार यांनी यावेळी सांगितले. पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत, पोलिस उपायुक्त संग्राम निशाणदार, पशुसंवर्धन आयुक्त विश्वासराव भोसले, महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे राजेंद्र जोशी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.