ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शनिवारी मध्यरात्रीपासून एसटी ते कुर्ला सहा तासांचा ब्लॉक

मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी)- कुर्ल्यातील कसाईवाडा पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून, पुलाच्या कामासाठी 28 मेच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजल्यापासून सीएसटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकदरम्यान मेन लाइनवरील 24 लोकल फेर्‍या तर हार्बरवरील 28 फेर्‍या आणि काही मेल-एक्स्प्रेसही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सीएसटीहून कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री साडे अकरा वाजता सोडण्यात येईल, तर रात्री साडे अकरानंतर सीएसटी मेन लाइनवरून सुटणार्‍या सर्व लोकल या कुर्ला स्थानकातून सोडण्यात येतील. हार्बर सीएसटीहून वाशीसाठी शेवटची लोकल रात्री 11.38 वाजता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर सीएसटीहून सुटणार्‍या हार्बरच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.