ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रितेश, जेनेलिया बनले पुन्हा आई-बाबा!

मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी)- बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी पुन्हा एकदा पुत्ररत्न झाले आहे. बुधवारी सकाळी रितेशने ट्विट करत ही बातमी दिली.
रितेश आणि जेनेलिया यांचा मोठा मुलगा रिआन एक वर्षांचा असून, त्याच्यावतीने ट्विट करताना रितेशने म्हटले आहे, की माझ्या आई बाबांनी मला छोटा भावाची भेट दिली आहे. आता माझी सगळी खेळणी त्याची होणार आहेत. या ट्विटसह रितेशने रिआनचा फोटो शेअर केला आहे. रितेशला या गोड बातमीबद्दल बॉलीवूडमधील कलाकार व दिग्दर्शकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. रितेशचे आता हाऊसफुल 3 आणि बँजो हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.