ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विनोदी अभिनेते रजाक खान यांचे निधन

मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी)- टपोरी भूमिकांसाठी ओळखले जाणारे विनोदी अभिनेते रजाक खान यांचे बुधवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 
केरा फेरी, रुप की रानी चोरों का राजा, हंगामा, राजा हिंदुस्थानी, प्यार किया तो डरना क्या, बादशाह यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमधून खान यांनी काम केले. त्यांनी 90 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. चित्रपटच नव्हे तर काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. नुक्कड या सर्वाधिक गाजलेल्या मालिकेत उल्हासभाईची त्यांनी साकारलेली भूमिकाही भरपूर गाजली. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्येही रजाक खान यांनी काम केलं होतं.