ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुलगाव दुर्घटनाग्रस्तांना एक कोटी 3 लाख रुपयांची मदत

शासन दुर्घटनाग्रस्त परिवाराच्या पाठीशी - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी)- वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 18 जणांच्या कुटुंबियांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये तर 13 जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 3 लाख रुपयांची मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्कम जिल्हाधिकारी, वर्धा यांच्या बँक खात्यात यापूर्वीच वर्ग करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडून दुर्घटनाग्रस्तांना मदतीचे धनादेश वाटताना मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीडित कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्य मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण राज्य तसेच देश आपल्या सर्व शोकाकूल परिवारांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दुर्घटनेत ज्या कुटुंबाने त्यांची जीवलग व्यक्ती गमावली त्याची भरपाई ही कितीही मोठी रक्कम दिली तरी होऊ शकत नाही. परंतु, शासन या सर्व परिवाराचे जीवन सुकर करण्यासाठी निश्चित मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अग्निशमन दलाचे जवान अमीत दांडेकर या दुघर्टनेत शहीद झाले. त्यांच्या पत्नी प्राची अमीत दांडेकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलतांना आपले पती हे शहीद झाले, सेवा बजावताना अमर झाले, त्याचा मला अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले तेव्हा संपूर्ण सभागृह हेलावून गेले. दुर्घटनेच्या दिवशी आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पुलगावला भेट दिली असून तेथील अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्याबरोबरच पुलगाव भांडाराकडे जाणारे रस्ते उत्तम करण्याच्या सूचना दिल्याचेही वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुलगाव दुर्घटनेमुळे आसपासच्या पाच गावामध्ये जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून त्यांनाही नुकसानभरपाई देण्याच्यादृष्टीने अहवाल तयार करत असल्याचे वर्धा येथील जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.