ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन

मुंबई, दि.४ (प्रतिनिधी) - ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या.गेले काही दिवस त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांची ही कर्करोगाशी झुंज आज अपयशी ठरली. मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.


मराठी रंगभूमीवरील महत्त्वाच्या रंगकमीर्ंमध्ये कायम त्यांचं नाव घेतलं गेलं. विजया मेहता, सत्यदेव दुबे यांच्यासोबतच सुलभा ताईंची नाट्यप्रतिभा ही कायमच चर्चेत असायची. पती अरविंद देशपांडे यांच्या सोबतीने ‘आविष्कार’या संस्थेची स्थापना करण्यापासून, ते या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी नाटकं सादर करण्यासाठी त्यांचा कायमच पुढाकार होता.

‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘वाडा चिरेबंदी’ यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यासोबतच मराठीत त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं मोठं नुकसान झालंय. ‘घर हो तो ऐसा…’,’इजाझत’, ‘भूमिका’, ‘वीरासत’, ‘इंग्लिश विंग्लिश’ अशा हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं होतं.

तर मराठीत ‘जैत रे जैत’, ‘विहीर’, ‘हापूस’, ‘इन्व्हेस्टमेंट’ यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारलीये. त्यामुळे त्यांना ‘आई’ अशी अोळख मिळाली होती. गेला काही काळ त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं अपरिमित नुकसान झाल आहे.