ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

ठाणे, दि. ६ (प्रतिनिधी)  –  शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अखेर रवींद्र फाटक यांनी बाजी मारली आहे. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच सेनेच्या रवींद्र फाटक यांनी आघाडी घेतली होती. 

या संपूर्ण लढतीत फाटक यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात होतं. अटीतटीच्या लढतीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा 151 मतांनी पराभव केला आहे. रवींद्र फाटक यांना 601 तर, डावखरे यांना 450 मतं मिळाली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रवींद्र फाटक यांनी डावखरे यांच्यावर आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. दोघांचं भवितव्य अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होतं. अपक्षांनी आपलं वजन फाटक यांच्या पारड्यात टाकल्याचं निकालातून दिसून आलं आहे. 

महायुतीला त्यांच्या संख्याबळापेक्षा 90 मतं अधिक मिळाल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. वसंत डावखरे यांनी पराभव मान्य केला असून विजयी उमेदवार फाटक यांचं अभिनंदन केलं आहे.