ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्री अटकेत

मुंबई, दि. ८- मुंबईच्या गोरेगावमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून दोन टीव्ही अभिनेत्री, एक मॉडेल आणि दोन दलालांना अटक करण्यात आली. यामध्ये ‘सावधान इंडिया’ या शोमधील एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. ‘दैनिक भास्कर’ने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. 

ज्या ठिकाणी हा छापा टाकण्यात आला, तो परिसर फिल्मसिटीपासून अतिशय जवळ आहे. शिवाय इथे दररोज अनेक टीव्ही कलाकारांची ये-जा सुरु असते.

मॉडेल, अभिनेत्री आणि दलालांना एका मॉलच्या बाहेर अटक करण्यात आली, अशी माहिती या रॅकेटचा खुलासा करणारे अमित जलाल यांनी दिली. अमित जलाल यांच्या माहितीनुसार, या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर आम्ही दलाल बनून सापळा रचला. याद्वारे आम्ही खरे दलाल सायरा आणि अशरफ उर्फ अमनपर्यंत पोहोचलो.

अमन तिथे पोहोचताच आम्ही त्याला अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक ‘सावधान इंडिया’मध्ये काम करणारी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि रॅम्प मॉडेल आहे.
या सगळ्यांविरोधात दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमागे कबीर नावाचा व्यक्ती आहे. कबीर हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नव्या तरुण-तरुणींना पैशांचं आमिष दाखवून या धंद्यात आणत असेल. कबीरच्या इशाऱ्यावरच अशरफ काम करतो. अशरफ हा कॉलेज विद्यार्थी असून तो शेवटच्या वर्षात शिकत आहे. दलाल सोशल वेबसाईट्सच्या माध्यामातून त्यांचे फोटो पाठवत, असं अमित जलाल यांनी सांगितलं.
सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री 50 हजारांपासून 1 लाख रुपये घेत असत. दलाल त्यांना बरेचदा हायप्रोफाईल बिजनेसमन आणि कॉर्पोरेट क्लायंटकडे पाठवत असत.