ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दिघावासियांना घरं रिकामी करावी लागणार

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) - नवी मुंबईजवळच्या दिघ्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. दिघावासियांची मुदतवाढीची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे.  

अनधिकृत घरं 31 मेपर्यंत घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर दिघावासीयांनी मुदतवाढीची मागणी केली होती. ती हायकोर्टाने फेटाळली आहे. तसंच हायकोर्टाच्या या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितलेला वेळही नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता तात्काळ दिघा वासियांना घरं रिकामी करावी लागणार आहेत.

 

यापूर्वी राज्य सरकारने या अनधिकृत इमारतींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी गृहनिर्माण मंत्री यांनी चारपट दंड आकारून इमारती नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 31 डिसेंबर 2015 पर्यंतची राज्यातील 2 लाख बांधकामं नियमित केल्याची घोषणा विधानसभेत केली होती. मात्र या इमारती आता तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.