ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज्यातील सर्व नगरपालिकांच्या सेवा 2 ऑक्टोबरपासून ऑनलाईन देणार- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या विविध विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जोडण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोंबरपासून नगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी विशेष ओळख प्राधिकरणाचे (यूआयडी) महासंचालक अजयभूषण पांडे, उपमहासंचालक संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, प्रधान सचिव के. गोविंदराज, महिला बाल विकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, कामगार विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुरेंद्रकुमार बागडे, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, माहिती तंत्रज्ञान संचालक मुथ्युस्वामी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील नगरपालिकेतर्फे देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने आदी येत्या 2 ऑक्टोबरपासून ऑनलाईन देण्यात यावेत. तसेच वैद्यकीय विभागातील सेवांसाठी एकाच ठिकाणाहून देता यावेत, यासाठी क्लाऊड बेस सिस्टीमचा उपयोग करावा. त्यामुळे कमी मनुष्यबळात जास्त काम होईल. शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांकडून आधार क्रमांक घ्यावेत. जेणेकरून त्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती देता येईल. सर्व योजनांतील वैयक्तिक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक घेऊन त्याची पडताळणी ई- केवायसी पद्धतीने करण्यात यावे. यासाठी लोकांचाही सहभाग घ्यावा. शिधावाटप करण्यासाठी आधार प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक पद्धती तातडीने संपूर्ण राज्यात राबवावी.
यापुढील काळात आधार कार्ड नोंदणी ही 0 ते 6 या वयोगटातील बालकांसाठी राबवावी. रुग्णालये, शाळा व अंगणवाडी येथे नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. यासाठी अंगणवाडी परिक्षकांना टॅब्लेट देण्यात यावेत. तसेच सहा महिन्यातून एकदा अंगणवाडीच्या ठिकाणी आधार नोंदणी शिबिर घेण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
येत्या महसूल दिनापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून राज्यातील सर्वच जमिनीच्या फेरफार नोंदी ऑनलाईन होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यात 17 लाख 83 हजार फेरफार नोंदी ऑनलाईन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगरपालिकेच्या मालमत्तांचे मॅपिंग सुरू असून नगरपालिकांच्या सर्व सेवा ऑनलाईन देण्यात येणार आहेत. राज्यातील सात कोटी शिधापत्रिका धारकांपैकी सहा कोटी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच शालेय शिक्षण विभागाच्या सरल योजनेत शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जोडण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मालमत्तेच्या नोंदी करताना आधार क्रमांकाचा वापर करण्यात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचेही पांडे यांनी सांगितले. वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट लाभ प्रदान योजनेद्वारेच यापुढे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी डिसेंबर 2017 पर्यंत सर्वांचे आधार क्रमांक जोडणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.