ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर

मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास विभागाने ही सोडत जाहीर केली.

सोडत पद्धतीचे आरक्षण खालीलप्रमाणे- 


अनुसूचित जाती - भंडारा, अमरावती

अनुसूचित जाती महिला राखीव - हिंगोली, नागपूर

अनुसूचित जमाती महिला -- नंदुरबार, ठाणे, गोंदिया

अनुसूचित जमाती - वर्धा, पालघर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी ) - जळगांव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ

सर्वसाधारण प्रवर्ग महिला - सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम

सर्वसाधारण प्रवर्ग - जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली

यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला , वाशीम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील.

पालघरचे जुलै २०१७ पासून  तर भंडारा, गोंदिया चे डिसेंबर २०१७ पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे २०१७ मार्च निवडणूक झाल्यानंतर लागू होणार आहे.