ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

’सैराट’च्या सक्सेस पार्टीत मराठी स्टार्सची मांदियाळी

मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी)-मराठीतला सुपरडुपर ब्लॉकबस्टर हिट सिनेमा ’ सैराट’ ने आतापर्यंत 85 कोटींची कमाई करुन 100 कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे. या निमित्ताने शनिवारी मुंबईत सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सैराटच्या टीमसह मराठीतील तारांगण अवतरले होते.
दिग्दर्शक नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख, अनुजा मुळे यांच्यासह दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेधा मांजरेकर, सत्या मांजरेकर, सुबोध भावे, उर्मिला कानेटकर, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, जयवंत वाडकर हे सेलेब्स सक्सेस पार्टीचा भाग बनले. याशिवाय संगीतकार जोडी अजय-अतुलसुद्धा आपल्या कुटुंबासोबत पार्टीत पोहोचले होते. सचिन पिळगावकर, रवी जाधव हे सेलिब्रिटीसुद्धा पार्टीत उपस्थित होते.
अवघ्या महाराष्ट्राला झिंगाट’ करुन सोडणारा हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहे. लवकरच हा सिनेमा तामिळ, मल्याळम, तेलुगू या तीन भाषेत येणार आहे. या सिनेमांचे नागराज मंजुळे हे स्वत: दिग्दर्शन करणार आहेत.