ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकर्‍यांंसाठी जिल्हा बँका मजबूत कराव्याच लागतील - चंद्रकांत पाटील

ठाणे, दि. 28 (प्रतिनिधी)- आज शेतकर्‍यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना मजबूत करण्यासाठी जिल्हा बँकामार्फत कर्ज पुरवठा केला जातो. काही ठराविक रकमेच्या कर्ज पुरवठ्यावर व्याज आकारले जात नाही आणि काही रकमेवर व्याज आकारले जाते. परंतु शेतकर्‍यांची परिस्थिती व्याज फेडण्याची नसल्याने जिल्हा बॅकांना तोटा सहन करावा लागत आहे. म्हणून शेतकर्‍यांबरोबरच जिल्हा बॅकांनाही मजबूत करावे लागेल, असे सहकार मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लि. मुंबईच्या वतीने राज्यातील जिल्हा बँकाची एक दिवसीय सभा वाशी, नवी मुंबई येथील बँकेच्या कार्यालयात भरविण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन पाटील बोलत होते. कार्यक्रमास प्रशासकीय मंडळाचे सदस्य के.एन. तांबे, अशोक मगदूम, मंडळाचे अध्यक्ष डॉ.एम.एल.सुखदेव आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
राज्यात शेतकर्‍यांबरोबरच सहकारी क्षेत्र मजबूत करायचे असेल तर शासनाला आणि सहकारी क्षेत्रातील सर्वांनाच जोमाने काम करावे लागेल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सक्षम झाल्याशिवाय राज्यातील शेतकरी सक्षम होणार नाही हे सत्य आहे. यावेळी अकोला, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि भंडारा या जिल्ह्याच्या सहकारी बँकांच्या अध्यक्षांनी आपल्या बँकांच्या समस्या आणि इतर सहकारी बँकांनाही येणार्‍या समस्यांचा उहापोह केला. दुपारच्या सत्रात सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्हा बँकेच्या पीक विमाबाबतचा आढावा घेतला.
प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच डॉ.एम.एल. सुखदेवे यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हा बँकांना आणि जिल्हा बँकेबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला येणार्‍या अडीअडचणी मांडल्या.