ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिक्षणमंत्र्यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी)- सोमवारी विदर्भातील शाळांचा पहिला दिवस... या दिनाचे औचित्य साधून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून विदर्भातील शाळांतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि एका अभिनव पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव साजरा केला.
विदर्भातील शाळा सोमवारपासून सुरु झाल्यानिमित्त शिक्षणमंत्र्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून गप्पा मारल्या. गडचिरोली शाळेतील विद्यार्थ्यांशी गोंड या भाषेतून, अमरावती मेळघाट या भागातील विद्यार्थ्यांशी कोरकू भाषेतून तावडे यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेला शौचालय आहे का? तेथील सुविधा योग्य आहेत का? शौचालयामध्ये पाण्याची सोय आहे का? याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी गडचिरोली येथील शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यातील सोयगाव गावातील जिल्हा परिषद शाळेत निर्माण केलेली ’स्वच्छता आर्मी’ याकरिता ही शाळा आघाडीवर असल्याची माहिती दिली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत चांगले शिकविले जाते म्हणून गोंदिया जिल्हा परिषद शाळेत आज 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावेळी पालकांशी संवाद साधला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण चांगल्याप्रकारे शिकविले जाते, म्हणून आम्ही जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याचे पालकांनी सांगितले. अमरावती येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तावडे यांनी शाळांना कम्पाऊंड आहे का, असे स्पष्ट त्यांना विचारले. गडचिरोलीच्या शाळामध्ये प्री प्रायमरी, पहिली व दुसरीसाठी माडिया भाषेतून अभ्यासक्रम सुरु करावा, असा विचार तावडे यांनी मांडला.
बुलढाणामधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तावडे यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकारात्मक दृष्टिकोन आढळून आला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सेमी इंग्लिश शाळेसाठी परवानगी आवश्यक आहे. परंतू त्या भागात इंग्रजी भाषा शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे सध्या अडचण आहे. परंतू स्पोकन इंग्लिशवर भर देऊन हा प्रश्न सोडविता येईल, असेही तावडे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सांगितले.
अमरावती जिल्ह्यातून काही जिल्हा परिषद शाळांना एनजीओमार्फत मदत देण्यात येत असून चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमध्येही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये लोकसहभागातून वाचन कट्टा तयार करण्यात आला आहे. चंद्रपूरमधील शाळांमध्ये दिवसभर वाचन कट्ट्यावर विविध प्रकारची पुस्तके वाचायला देतात. या शाळांना लोकसहभागातून रूपये 10,000 देणगी व 5,000 पुस्तके भेट दिली आहेत. याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे, असे त्यांनी शिक्षणमंत्र्यांना सांगितले. बुलढाण्यातील शाळांमध्ये तयार करण्यात आलेल्या वाचन कट्ट्यासाठी रुपये 10,000 ची पुस्तके शाळेला भेट देण्यात आली आहेत. तेथील गावकर्‍यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बेंच उपलब्ध करुन दिले आहेत. गडचिरोली शाळांमध्येही अशा पद्धतीचा वाचनकट्टा सुरु आहे.
याप्रसंगी शिक्षण विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार, राज्य परीक्षा परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे आदी उपस्थित होते.