ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मी दहशतवादाला प्रोत्साहन दिले नाही- झाकिर नाईक

मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी)- मी गेल्या 25 वर्षांपासून जाहीर व्याख्याने देत असून कधीही दहशतवादाला प्रोत्साहन दिलेले नाही, अशा प्रतिक्रिया मुस्लिम धर्मोपदेशक झाकिर नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.
स्काईपद्वारे नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नीस येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्यावर झालेल्या सर्व आरोप खोडून काढणारी माहिती देणारे पेन ड्राईव्हज् मी सर्वांना देणार आहे. आपण निष्पक्षपातपणे त्याकडे पाहावे. त्यातून मी निर्दोष असल्याचे तुम्हाला दिसेल. तसेच माध्यमांनी माझ्या वक्तव्य बदलल्याचा आरोपही त्यांनी केला. निर्दोष लोकांना ठार करणार्‍या आत्मघातकी हल्ल्याला इस्लाममध्ये परवानगी नसून तो चूक असल्याचेही नाईक म्हणाले. मी शांतीसाठी व्याख्याने देतो, हिंसेसाठी चिथावणी देत नाही, असा दावाही यावेळी त्यांनी केला.
बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी डॉ. नाईक यांचे नाव घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन आपण दहशतवादी बनलो. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, असे सांगितल्याचे उघड झाल्याने ते चर्चेत आले आहेत. या हल्ल्यात  एका भारतीय युवतीसह वीस जणांचा मृत्यू झाला.