ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

... आणि पालकमंत्र्यांनी स्वत: केली भात लावणी

ग्रामीण भागातील महिलांना मिळाले उत्पनाचे साधन
ठाणे, दि. 16 (प्रतिनिधी)- भात लागवडीसाठी येणार्‍या खर्चात आणि वेळेत 50 टक्के पेक्षा जास्त बचत करणार्‍या भात लावणी यंत्रांचे प्रात्यक्षिक काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झाले. पालकमंत्र्यांनी यावेळी स्वत: हे यंत्र चालवून भात लागवडही केली. पडघ्याजवळ वडवली गावात शेतकर्‍यांच्या विशेषत: महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला. ठाणे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.
ठाणे जिल्हा परिषदेने भात शेतीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. भात शेतीसाठी सर्वात जास्त खर्च हा मजुरांवर होतो. भात लागवडीसाठी जमीन तयार करणे, चिखलणी, लावणी, काढणी, मळणी या प्रत्येक कामासाठी मजूर लागतात. मात्र या यंत्रामुळे लावणीच्या खर्चात 50 टक्के, तर मजुरांच्या संख्येत व वेळेत 75 टक्के बचत होत असून एका तासासाठी अर्धा लिटर डिझेल लागते, एका दिवसात तीन एकर क्षेत्राची लावणी होते. यासाठी फक्त चार मजूर लागतात, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.
भात लावणीपासून ते काढणी पर्यंत एकंदर 87 मजूर प्रतिदिन लागतात. एका दिवसासाठी या मजुरांचा खर्च हेक्टरी 30 हजार 450 रुपये येतो. (350 रुपये प्रतिदिन मजुरी) संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 60 हजार 717 हेक्टर जमिनीवर भाताची लागवड केली जाते आणि संपूर्ण प्रक्रियेसाठी 52 लाखांपेक्षा जास्त मजूर लागतात. त्यांची केवळ मजुरीच 184.52 कोटी होते. एकूण उत्पादन खर्चाच्या 90 टक्के खर्च हा मजुरीवर जातो, अशी माहिती यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी यांत्रिकीकरणाची कास धरल्यास वेळ, पैसा व श्रमात बचत होऊन शेती फायदेशीर ठरू शकते. भात शेतीवर देण्यात येणारा भर कमी करून बारमाही शेती कशी करू त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करून त्याचे विपणन व्यावासायिक पद्धतीने व्हावे त्यातून त्यांना चांगला नफा मिळावा यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत.या यंत्राने लावणी करण्यासाठी चटई रोपवाटिकेची (मॅट नर्सरी) आवश्यकता असते. अशी रोपवाटिकाही गावात श्रीराम ग्राम संस्था, वडवली यांनी केली असून याठिकाणी देखील पालकमंत्र्यांनी भेट दिली.