ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोपर्डी अत्याचारप्रकरणी जनक्षोभानंतर तिघे अटकेत; फास्ट ट्रॅक सुनावणी

मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात जनक्षोभ उसळल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी दोघांना न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
दरम्यान, रविवारी आरोपींना नगर जिल्हा न्यायालयात नेले जात असताना शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली. जितेंद्र बाबालाल शिंदे, संतोष गोरख भवाळ या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याला रविवारी सकाळी पुण्यातून अटक करण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. गेल्या बुधवारी अत्याचाराची व खुनाची ही घटना घडल्यानंतर गुरुवारपासून नगर जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. स्थानिक नागरिक व विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी बंद, रास्ता रोको आंदोलने करून सरकारला अत्याचाराची गंभीर दखल घेण्यास भाग पाडले. शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याने तणाव वाढत चालला होता. दरम्यान, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दुपारी कोपर्डीला भेट दिली. तथापि संतप्त ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत त्यांना रोखले. घटना घडल्यानंतर इतक्या उशिरा भेट देण्यासाठी आल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर केसरकर यांनी आरोपींना कडक शासन करण्याबाबत पीडित कुटुंबीयांना आश्वासन दिले.