ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 13 विधेयके मांडणार- मुख्यमंत्री

राज्यात समाधानकारक मान्सूनमुळे जलाशय साठ्यात वाढ
मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी)- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य शासनातर्फे विधानसभेत दहा आणि विधानपरिषदेत तीन अशी तेरा विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच राज्यात मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाला असून पेरण्याही मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार दि. 18 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापान कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स विकास मंत्री महादेव जानकर, बंदरे व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत दहा आणि विधानपरिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. यंदा राज्यात 1 जून ते 16 जुलै या कालावधीत सरासरी 419 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हा सरासरीच्या 104 टक्के पाऊस असून गेल्यावर्षी या कालावधीत याच काळात सरासरीच्या 58 टक्के पाऊस झाला होता. या काळात राज्यातील 23 जिल्ह्यात 100 टक्के तर आठ जिल्ह्यात 76 ते 100 टक्के आणि तीन जिल्ह्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयात सध्या 34 टक्के पाणीसाठा असून गेल्यावर्षी तो 26 टक्के इतका होता. 
-------------------------------------------------------
वंचितांना न्याय्य हक्क देण्याचीच शासनाची भूमिका- जयकुमार रावल
चाळीसगाव, दि. 18 (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांना त्यांचा न्याय्य हक्क दिलाच पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. त्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
चाळीसगाव येथे महाराणा प्रताप ट्रस्टच्या वतीने राजपूत भामटा/परदेशी भामटा समाजः वास्तव आणि संघर्ष’, या प्रा.सज्जनसिंग पवार लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी रावल बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार आर.ओ. पाटील हे होते. सोहळ्याला आमदार किशोर पाटील, माहिती आयुक्त पुणे- नाशिक रवींद्र जाधव, निवृत्त न्यायाधीश सी.जी. बैस, अमरजित गिरासे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, उदेसिंग पवार, ठाणसिंग पाटील, दीपक पवार, जयपालसिंग सिसोदिया, गोकुळ राजपूत, दरबारसिंग गिरासे, भगतसिंग पाटील आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुस्तकाचे प्रकाशक नरेंद्रसिंग सौकुदे व लेखक प्रा. सज्जनसिंग पवार यांनी मनोगत व्यक्त केले.