ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लोकांच्या जीवनात चैतन्य फुलविले- फडणवीस

मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी)- लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी जीवनभर कलेची सेवा केली. त्यांनी कलेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात चैतन्य फुलविण्याचे काम केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
रवींद्र नाट्य मंदिर येथे वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कार वितरण सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी वत्सला प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त संदेश उमप, अभिनेते मकरंद अनासपुरे, मुंबई मित्रचे अभिजीत राणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळा हा खर्‍या अर्थाने लोककलावंतांचा सोहळा आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी जीवनभर कलेची सेवा केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी असामान्य कार्य केले आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या कलाप्रकारामध्ये आपला ठसा उमटवला आणि समाजाला जागृत केले, अशा व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार देण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांना लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध जीवनगौरव पुरस्कार फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवाय अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, लोककलेचे अभ्यासक प्रकाश खांडगे, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कार प्रदान करण्यात आला.