ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नियमनमुक्तीमुळे अवघ्या तीन तासात संपला 40 क्विंटल भाजीपाला

मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी)- फळे व भाजीपाला नियमनमुक्तीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. रविवारी आगस्ता इन्फ्राकॉन या डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स होल्डर कंपनीने नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बांधावरुन खरेदी केलेला शेतमाल मुंबईतील ग्राहकांना विकण्यास सुरुवात केली आहे. मालाड येथील श्रीशक्ती कृपा मित्र मंडळाच्या सहकार्याने नागरिकांसाठी दिलेल्या या सुविधेमुळे बाजारभावापेक्षा स्वस्त व ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती. अवघ्या तीन तासांत 40 क्विंटल भाजीपाला ग्राहकांनी हातोहात खरेदी तर केलाच पण ताजा व स्वस्त भाजीपाला मिळाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भावही दिसून आले.
राज्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. या शेतकर्‍यांना लाभदायक ठरेल असे निर्णय राज्य शासन घेत आहे. त्यापैकीच एक असलेला अतिशय धोरणात्मक निर्णय म्हणजे बाजार समितीच्या आवारातून फळे व भाजीपाला नियमनमुक्त करणे हा होय. या निर्णयामुळे शेतकर्‍यांबरोबरच ग्राहकांचेही हित साधले जात असल्याचा प्रत्यय रविवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.
मुंबईस्थित असलेल्या केतन गोराडिया, सिद्धार्थ कटारिया, दिप्ती गोराडिया, मनीष भेल यांनी एकत्र येऊन आगस्ता इन्फ्राकॉन या कंपनीने 2013 मध्ये व्यवसायास सुरुवात केली. 2015 मध्ये पणन मंडळाकडून डायरेक्ट मार्केटिंगचा परवाना घेतला. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, चांदवड, वडनेरभैरव, वडाळीभोई या भागातील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यास सुरुवात केली. हा खरेदी केलेला शेतमाल दर्जा, प्रतवारी, छाननी व पॅकिंग करुन मुंबईला पाठविला जातो. शेतकर्‍यांना त्यांच्या मालाची किंमत लगेच देण्यात येते. सद्य:परिस्थितीमध्ये या कंपनीमार्फत अंधेरी येथे 3, मालाड येथे 3 तर विलेपार्ले, माहिम, खार, कांदिवली येथे प्रत्येकी एक अशा एकूण 10 ठिकाणी शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला हा शेतमाल रविवार ते शुक्रवार असे आठवड्याचे सहा दिवस दररोज विकण्यात येतो.
शनिवारी साप्ताहिक सुट्टी घेण्यात येते. दक्षिण मुंबई परिसरातून अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे चेअरमन आमच्या परिसरात भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्याची मागणी करीत आहे. त्यादृष्टिनेही आमचे नियोजन सुरु असून सध्या दररोज 20 टनांपेक्षा अधिक शेतमाल विकला जात आहे. यासाठी पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याची माहिती कंपनीच्या दिप्ती गोराडिया यांनी दिली.
शासनाने भाजीपाला नियमनमुक्तीच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचा आडत, दलाली, हमाली हा खर्च वाचणार असून आता व्यापक स्वरुपात शेतमाल खरेदी करुन ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीस विकण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या या निर्णयामुळे शेतमाल खरेदीची किंमत कमी होणार असल्याने आता आम्हाला ग्राहकांना भाजीपाला आणखी स्वस्तात देता येईल, अशी माहिती सिद्धार्थ कटारिया यांनी दिली.
मालाड परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या श्रीशक्ती कृपा मित्र मंडळाच्या सहकार्याने कंपनीने शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला शेतमाल ग्राहकांना विकण्यात आला. या उपक्रमांतर्गत आज नागरिकांना कांदे 15 रुपये, बटाटे 25 रुपये, काकडी 20 रुपये, टोमॅटो 40 रुपये, दुधी 40 रुपये, कोबी 40 रुपये, कलिंगड 40 रुपये या दराने हा भाजीपाला व फळे खरेदी करता आले. बाजारभावापेक्षा अधिक स्वस्त व ताजे त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे कांदे 20 क्विंटल, बटाटे 10 क्विंटल, टोमॅटो 5 क्विंटल, कोबी 2 क्विंटल, दुधी 2 क्विंटल तर काकडी 1 क्विंटल अवघ्या तीन तासांत हातोहात संपल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त हितेश ओझा यांनी दिली.