ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईत म्हाडातील 972 घरांसाठी एक लाखाहून अधिक अर्ज

मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी)- म्हाडाच्या मुंबई विभागातील 972 घरांसाठी येत्या 10 ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात येणार असून, आतापर्यंत या घरांसाठी एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. म्हाडाच्या सोडतीची घरे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहे. म्हाडाच्या सोडतीच्या घरांसाठी 23 जून ते 23 जुलै यावेळेत नोंदणी करता येईल. 
24 जून ते 25 जुलै याकाळात ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 25 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत आहे. तर अ‍ॅक्सिस बँकेत डीडी भरण्याचा कालावधी 24 जून ते 27 जूलै असा आहे. घरांची सोडत 10 ऑगस्ट रोजी काढण्यात येईल. म्हाडाच्या 972 घरांपैकी 477 घरे खल्या गटासाठी उपलब्ध आहे. उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत; आणि त्यांची किंमत 83 लाख 86 हजार एवढी आहे. तर अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत 8 लाख 17 हजार एवढी आहे.