ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

इंद्रायणीनगरमधील मतदार विक्रांतच्या पाठीशी - लांडे

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) - इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांचे काय व्यवसाय आहेत एवढे कळण्याएवढा इंद्रायणीनगरमधील मतदार सूज्ञ असून, सूज्ञ, सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि राजकीय वारसा असलेल्या विक्रांत लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचारात रंगत येवू लागली आहे. भोसरी विधानसभेवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माजी आमदार लांडे यांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीची तयारी आणि विक्रांत लांडे यांच्याबाबत काही ठराविक माध्यमातून उठविण्यात येणार्‍या अपप्रचाराचा लांडे यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना लांडे म्हणाले, भोसरीचा विकास कोणी केला याची जाणिव येथील मतदारांना चांगली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाची नव्हे तर नरेंद्र मोदी यांची हवा होती म्हणून अपयश आले. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. भाजपाचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. इतरांवर खोटे नाटे आरोप करणे आणि स्वत:ची पोळी भाजून घेणे, असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भोसरी गावठाणामध्ये सर्वाधिक इच्छुक राष्ट्रवादीकडे आहेत. इंद्रायणीनगरमधील काही मतदारांनी विक्रांत याला प्रभाग क्रमांक ८ मधून उभे करावे, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. नागरिकांच्या आग्रहाखातर विक्रांत प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढविणार आहे. 

अचानकपणे महानपण भेटलेले काहीजण जाणिवपूर्वक टीका करत आहेत. इंद्रायणीनगरमधील जनता सुज्ञ आहे. विक्रांतचे शिक्षण वाणिज्य पदवीधर व बिझनेस ट्रेनिंग कोर्स झालेले आहे. त्यामुळे सुशिल, सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि तरुण म्हणून विक्रांतला अधिक पसंती देतील, यात तिळमात्र शंका नाही. भाजपाचे एक इच्छुक उमेदवार विक्रांतवर टीका करताना दिसताहेत. त्यांनी खरेच इंद्रायणीनगरमध्ये निवडणूक लढवावी. भाजपाची जागा अडवून धरून आयत्यावेळी उमेदवारी माघारी घेवू नये. जनता कोणाच्या पाठीशी आहे, हे त्यांना निवडणुकीनंतर समजून येईल. प्रचाराची पातळी आम्ही कधीच सोडलेली नाही व सोडणार नाही. मात्र जशास तसे उत्तर देण्यासही आता मागेपुढे पाहणार नाही. 

विधानसभा निवडणुकीतही लोकांना विकासाचे गाजर दाखविणाऱ्यांनी भाजपाने अडीच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडावा, असे आवाहनही लांडे यांनी यावेळी केले. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, मोशी कचरा डेपोचे स्थलांतर आदी मुद्यांवर भाजपाचे आपले धोरण स्पष्ट करावे. सत्ता आल्यानंतर शंभर दिवसांत निर्णय घेऊ म्हणणाऱ्यांची शंभरी भरली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील जनता कोणाच्या पाठीशी आहे, हे नक्कीच दाखवून देईल, आणि मागल्या दाराने तडजोडी करणाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही लांडे यांनी यावेळी व्यक्त केला.