ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी चाकणमध्ये आंदोलन

पिंपरी, दि. २१ - महाराष्ट्रातील बैलगाडयांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी करत चाकणमध्ये बैलगाडा मालकांनी आंदोलन केलं. तामिळनाडूतील जलिकुट्टी खेळाला देखील या आंदोलनातून पाठिंबा दर्शवला आहे. तामिळनाडूत बैलगाडा शर्यतीला जलिकुट्टी या नावाने ओळखले जाते.

तामिळनाडूतील जलिकट्टूवरुन चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयाने जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे. हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला येणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी जोर धरत आहे.

बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी चाकणमधील बैलगाडा मालकांनी आंदोलन केले. बैलगाडा मालकांच्या या आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता.

बैलगाडी शर्यतीमुळे ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू अ‍ॅनिमल’ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे सांगत ‘पेटा इंडिया’ या पशू अत्याचाराविरोधात लढणाऱ्या संस्थेने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शर्यतीत बैलांना क्रूरपणे वागवण्यात येते आदी मुद्दे याचिकाकर्त्यांनी मांडले होते.  त्यानंतर २०११ साली सर्वोच्च न्यायालयाने वाघ, माकड, सांड, बिबटय़ा, अस्वल या प्राण्यांच्या खेळावर तसेच प्रदर्शनावर बंदी घातली.