ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुलांना समजून घ्या - प्रकाश दिलपाक

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) - मुलांना समजून घेऊन त्यांची जडणघडण करणे आवश्‍यक आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ शकेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दिलपाक यांनी येथे व्यक्त केले. 

चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रह्म काव्य, योगसंस्कार, विविधांगी सेवा संस्थेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माहिती अधिकार असोसिएशनचे अध्यक्ष रामदास जंगम होते. विश्‍वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रमुख व्यंकटेश वाघमोडे, सुनीता मालुसरे, संस्थेचे प्रभाकर चव्हाण, बाळासाहेब वाघमोडे, दत्ता महापुरे आदी उपस्थित होते. या वेळी योगामध्ये प्राविण्य मिळवलेल्या मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

दिलपाक म्हणाले, प्रत्येक मूल वेगळे असते. याची जाणीव ठेऊन त्याला समजून घेण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा. मुलांशी संवाद ठेवायला हवा. त्यातून मुले खऱ्या अर्थाने घडू शकतील. 
जंगम म्हणाले, राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी महापुरुषांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी पालक, शिक्षक सर्वांनीच जागरूक राहावे. चांगल्या स्वास्थ्यासाठी योग-प्राणायामाचा संस्कार गरजेचा आहे. तर वाघमोडे म्हणाले, पुस्तकांमध्ये संस्कार घडविण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे शालेय पातळीपासूनच वाचनसंस्कृती वाढवली पाहिजे. 

रंगले बालकवी संमेलन 
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके व योगगीते सादर केली. योगेश धस, विशाल वीरकायदे, सुयोग भगत, वैष्णवी साठे, भगवती फलफले, साक्षी गायकवाड यांनी कविता सादर केल्या. शैलेश घाग, ज्ञानेश्वर कुंजीर, रजनी पवार, चंद्रकांत आंबे यांचीही या वेळी उपस्थिती होती. मेघना आंब्रे यांनी सूत्रसंचालन केले.