ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बांधकाम साईटवर अपघात; चार जण गंभीर

हिंजवडी, दि. 4 (न्यूज मेट्रो) -  बांधकाम साईटवरील क्रेनची उंची वाढवत असताना क्रेन ना दुरुस्त झाल्याने खाली पडून झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास हिंजवडी फेज 3 येथे घडली. 
 
जखमींना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज 3 येथे ईवॉन या बांधकाम साईटचे काम सुरू आहे. शनिवार दुपारी कामगार काम करत होते. त्यावेळी क्रेनची उंची वाढवत असताना क्रेन ना दुरुस्त झाल्याने खाली पडले. त्यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती, हिंजवडी पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.