ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रभाक क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन

उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
चिखली, दि. 5 (न्यूज मेट्रो) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकनाथ थोरात, अशोक मगर, गंगाताई ढेंडे व सुभद्रा ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारपासून प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी बोलताना एकनाथ थोरात म्हणाले, राष्ट्रवादीने गेल्या दहा वर्षांत शहराचा जो विकास केला आहे त्या विकासाला आपली साथ हवी आहे. जगाला हेवा वाटेल, असे शहर आपणाला बनवायचे आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीने आपण विश्वास दाखविला त्याच विश्वासाने यावेळी देखील आपली साथ हवी आहे. विरोधकांच्या भूलथापाला बळी न पडता विकासासाठी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सत्ता सोपवा, असे आवाहनही थोरात यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलच्या अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी केले होते. यावेळी नगरसेविका वनिता थोरात, आनंदा यादव, जितेंद्र सावंत, दिगंबर गरुड, मनिषा गटकळ, अनिल भोसले, मोहन मातेकर, शिवानंद चौगुले, सिद्धार्थ मोरे, मनोज सुतार, आनंद गरुड, दिपक गुंजाळ, काशीनाथ लोखंडे, प्रशांत जाधव, हिंदूराव पाटील, हनुमंत पाटील, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.