ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

दापोडी - कासारवाडीत शिवसेनेची ताकद वाढली आहे - खासदार बारणे

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) - संजय (नाना) काटे यांच्या सारखा प्रामाणिक चांगले काम करणारा आणि उच्च शिक्षित उमेदवार शिवसेनेला मिळाल्यामुळे दापोडी - कासारवाडीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. आजच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी नागरीकांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता प्रभाग क्र. 30 मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. 


दापोडी - कासारवाडी प्रभाग क्र. 30 मधील शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक संजय (नाना) केशव काटे, छाया तुषार नवले, शुभांगी प्रविण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांच्या शास्त्रीनगर कासारवाडी येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. 

यावेळी चंद्रकांत काटे पाटील, शिवसेनेचे विभाग प्रमुख तुषार नवले, हाजी शेख, उपविभाग प्रमुख चंद्रकांत शिंदे आणि विलास आण्णा काटे, अनिल तारू, पद्मिनी कांबळे, जन्नत (बाई) शेख, जलाल शेख, बाळासाहेब जगदाळे, निलेश सोनवणे, अर्जून लांडगे, शिवा कु-हाडकर, एकनाथ हाके, सुनिल ओव्हाळ, राजू सोलापुरे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. 

यावेळी खासदार बारणे पुढे म्हणाले की, मागील पंधरा वर्षांत दापोडी - कासारवाडी भागात कोणतेही मोठे विकास प्रकल्प झाले नाहीत. पुणे मुंबई महामार्गावरील प्रलंबित बीआरटी प्रकल्पामुळे वाहतूक सुरळीत होण्याएैवजी समस्येत भर पडली आहे. झोपडपट्टी परिसरात देखिल राष्ट्रवादी कॉंग्रेसनी दुर्लक्ष केल्याचे जाणवते. नगरसेवक संजय (नाना) काटे यांच्या पाठपुराव्यामुळे हॅरीस पुलाला समांतर पुल उभारण्याचे काम वेगाने होत आहे. त्यामुळे लाखो नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. अशा अनेक समस्या शिवसेनेचे पॅनेल निवडून आल्यावर आपण एकजूटीने पाठपुरावा करु. असेही खासदार बारणे म्हणाले.