ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

"शहराच्या गतीमान विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहावे"

प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवारांचे मतदारांना आवाहन

भोसरी, दि. १० (प्रतिनिधी) - गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्यात यश आले. शहराचा विकास अधिक गतीमान पद्धतीने करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे रहावे असे अवाहन प्रभाग क्रमांक आठमधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांनी केले.

महापालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, सोनाजी उदावंत व सविता झोंबाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचार सुरू केल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढत पहिली फेरी पूर्ण केली आहे.

आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्र कॉलनी, वैष्णोमाता कॉलनी, सेक्टर एक तसेच विविध सोसायट्यांमध्ये चारही उमेदवारांनी मतदारांनी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले. दुपारच्या सत्रामध्ये सेक्टर क्रमांक ६, सेक्टर ९ व सेक्टर ११ मधील विविध सोसायटयांमधील मतदारांशी उमेदवारांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत झालेल्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सध्या झालेल्या विकासकामांशिवाय पुढील पाच वर्षांत प्रभागाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी तसेच विकासाची गंगा तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले. विविध सोसायट्यांमध्ये उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद, ठिकठिकाणी औक्षण करून देण्यात आलेल्या शुभेच्छा, नागरिकांकडून स्वत:हून मिळत असलेला पाठींबा यामुळे निवडणुकीच्या निकालाचे चित्र आतापासूनच स्पष्ट होवू लागले आहे.

विविध सोसायट्यांमधील संवादानंतर उमेदवारांच्या वतीने बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांद्वारे परिसरातील समस्या जाणून घेण्यात आल्या. या समस्या तत्काळ सोडविण्याचे अभिवचन उमेदवारांच्या वतीने देण्यात आले. विविध सोसायट्यांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये मतदारांनी राष्ट्रवादीच्या पॅनलला एकमुखी पाठींबा जाहीर केला.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news