ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केवळ भोसरीतच नव्हे तर पालिकेवर राष्ट्रवादीचा सत्ता आणणार

विलास लांडे यांची गर्जना; इंद्रायणीनगरमध्ये कोपरासभा
भोसरी, दि. 12 (प्रतिनिधी) - केवळ इंद्रायणीनगर अथवा भोसरी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर शहरातून राष्ट्रवादीचे अधिकाधिक नगरसेवक विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून विजयाची हॅटट्रीक साधणार असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.
इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय वाबळे, विक्रांत लांडे, सोनाली उदावंत, सविता झोंबाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेमध्ये विलास लांडे यांनी हा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बालाजीनगर, गणेशनगर, खंडेवस्ती, विदर्भ मित्र मंडळाचा मेळावा असे विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना लांडे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे आणि त्यांना राजकारणात संधी देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. आमचा सर्वात सामान्य कार्यकर्ताही महापालिकेत नगरसेवक म्हणून आम्ही पाठविला आहे. यावेळी देखील भोसरीसह संपूर्ण शहरात निष्ठावंत कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. या सर्वांचा विजय निश्चित असून विकास कामांसाठी राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहनही लांडे यांनी यावेळी केले.
बालाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीपान झोंबाडे म्हणाले, गेली दहा वर्षे या बालाजीनगरला स्थानिक नगरसेवक मिळालेला नाही. त्यामुळे विकासकामांत बालाजीनगरकडे दूर्लक्ष झाले आहे. यावेळी सविता झोंबाडे यांच्या रुपाने राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवार दिला आहे. गेल्या दहा वर्षांतील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी करा. यावेळी बोलताना संजय वाबळे म्हणाले, बहुजनांच्या विकासाला नेहमीच आम्ही प्राधान्य दिले आहे. बहुजन समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून सर्वसामान्यांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. विक्रांत लांडे, सविता झोंबाडे, सोनाली उदावंत यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
बालाजीनगरनंतर गणेशनगर, खंडेवस्ती, निसर्ग प्राईड सेक्टर नं3, प्रगती सोसायटी सेक्टर नं 6 व स्कीम नंबर 1120 या ठिकाणी कोपरा सभा व गाठीभेटी झाल्या. विविध ठिकाणी झालेल्या सभा व गाठीभेटींमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गणेशनगर येथील प्रश्न सोडविल्याबद्दल मतदारांनी उमेदवारांचे आभार मानून निवडणुकीसाठी पाठींबा दिला. 
विदर्भ मित्र मंडळाचा जाहीर पाठींबा
इंद्रायणीनगर प्रभागाचा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होऊ शकतो, असा विश्वास दाखवित विदर्भ मित्र मंडळाने प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला. विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय वाबळे, विक्रांत लांडे, सोनाली उदावंत व सविता झोंबाडे हे चारही उमेदवार उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान मंडळाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलवर विश्वास व्यक्त करत महापालिका निवडणुकीसाठी पाठींबा जाहीर केला.