ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शास्तीकराची भाजपकडून दिशाभूल

राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री डांगे यांचा आरोप

भोसरी, दि. १७ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील नागरिकांच्या अत्‍यंत जिव्‍हाळ्याचा प्रश्न म्‍हणजे अनधिकृत बांधकामे व शास्‍तीकर.
११ जानेवारी २०१७ रोजी अध्यादेश क्र. 201701111557113625 यानुसार शास्‍तीकरात माफी किंवा सवलत देण्यात आली. सदरचा अध्यादेश माहिती अधिकार कायदा २००५ कलम ४ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्‍ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, हा अध्यादेश दि. १७-२-२०१७ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्‍ध नाही. 

वर्तमानपत्रामधील यासंबंधातील बातमी वाचून महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असता संबंधित अध्यादेशाची प्रत त्‍यांच्याकडे अद्यापपर्यंत पोहोचली नाही, असे महानगरपालिकेमधील प्रशासनाने सांगितले.

या संबंधी आम्‍ही पुणे व सोलापूर महानगरपालिकेकडे चौकशी केली असता त्‍यांच्याकडेही हा अध्यादेश उपलब्‍ध नाही किंवा त्‍यासंबंधात महाराष्ट्र शासनाकडून कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

त्‍यामुळे अध्यादेशाबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदारांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री डांगे यांनी केला आहे.