ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महेश लांडगेंचा विधानभवनात बैलगाडीने प्रवेशाच्या प्लॅनचा फज्जा

मुंबई, दि. ६ - पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांचा विधानभवनात बैलगाडीने प्रवेश करण्याचा प्लॅन चांगलाच फसला. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने लांडगे यांना राहत्या घरीच बैलगाडी ठेवावी लागली.

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी आमदार महेश लांडगे आज बैलगाडी घेऊन विधानभवनात प्रवेश करणार होते. त्यासाठी त्यांनी बैलगाडी मुंबईतही आणली होती. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे बैलगाडी घरीच ठेवून त्यांना विधानभवनात जावं लागलं.

राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालीना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे. त्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून अनेकजण प्रयत्नशिल आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक नेते मागील अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. तमिळनाडूमधील जलीकट्टू स्पर्धेच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करावी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी आमदार लांडगे यांनी करत आहेत.