ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

दिराचा भावजयवर बलात्कार; पिडीतेचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी, दि. ७ - खेड तालुक्यातील पाईट येथे एका चुलत दिराने आपल्या भावजयवर बलात्कार केला. या घटनेनंतर पिडीत महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न केला. पिडीत महिलेवर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सत्तावीस वर्षीय पिडीत महिलेने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहिता दोन दिवसांपूर्वी घरात टीव्ही पहात असताना आरोपी घरामध्ये आला. त्याने पिडीत महिलेला धमकावून बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार आरोपीच्या बायकोने पाहिल्याने आरोपी आणि त्याच्या बायकोमध्ये दोन दिवसांपासून वाद सुरु होते. त्यानंतर पिडीत विवाहितेने विषारी औषध प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.