ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नाशिक फाटा येथे पेटवून लुटलेल्या वृद्धाचा मृत्यू

भोसरी, दि. ९ - लुटून पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा आज (गुरुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वृद्धाची पत्नी व जावयासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ७) भरदुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाटा येथे घडली होती.  

उद्धव आसाराम उनवणे (वय ६५, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुमन उद्धव उनवणे आणि जावाई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्यासह इतर तिघांविरोधात भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उद्धव उनवणे हे बुधवारी नाशिकवरुन पैसे घेऊन वल्लभनगर बस स्थानकात आले होते. वल्लभनगर स्थानकातून ते नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांना तुम्ही उनवणेच काय असे विचारले आणि मारहाण केली.

त्यांच्याकडील २० हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि डोक्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन पोबारा केला. पत्नी सुमन आणि जावई ज्ञानेश्वर यांनीच मारहाण करायला लावले असल्याचे वृद्धाने फिर्यादीत नमूद केले आहे. 

यामध्ये उनवणे गंभीर भाजले होते. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.