ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भोसरीत बैलगाडा शर्यतीची जंगी तयारी

पुणे, दि. १२ - राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीला मंजुरी दिल्यानंतर भोसरीत बैलगाडा मालकांनी शर्यतीची जंगी तयारी सुरू केली आहे. मात्र, बैलगाडा शर्यतीला केंद्र सरकारची अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे भोसरीच्या भैरवनाथ उत्सवात बैलगाडा शर्यत होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे 

भोसरीसह पुणे जिल्हायात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. २०११ साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमधील बैलगाड्या शर्यती बंद झाल्या होत्या. राज्य सरकारने बैलगाडा सुरु करण्याचे विधेयक नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारीत केले आहे. याबाबतचा अध्यादेश 6 एप्रिल रोजी पारित केला आहे 

भोसरीत भैरवनाथ उत्सवात बैलगाडा शर्यत घेतली जाते. आजपासून उत्सवाला सुरवात देखील झाली आहे. उद्यापर्यंत हा उत्सव असणार आहे. या उत्सवामध्ये बैलगाडा शर्यत घेण्यासाठी बैलगाडा मालकांनी जंगी तयारी केली आहे. मात्र, याला केंद्र सरकारची मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार की नाही याकडे सगळ्यांचे नजरा लागल्या आहेत 

याबाबत बोलताना बैलगाडा संघटनेचे अशोक लांडगे म्हणाले की, राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीला मंजुरी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारची मंजूरी मिळाली नाही. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून दोन दिवसात केंद्र सरकारचीही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भोसरीच्या भैरवनाथ उत्सवात बैलगाडा शर्यत घेतल्या जातात

 शेतक-यांनी बैलगाडा शर्यतीची जंगी तयारी सुरू केली आहे. मात्र, केंद्र सरकारची मंजुरी मिळाली नसल्यामुळे आणि आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनामुळे बैलगाडा शर्यत घेतल्या जाणार नाहीत. आमदार लांडगे यांनी नियमाचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शर्यतीला केंद्र सरकारची लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे, आमदार लांडगेंनी सांगितले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सर्वांत पहिल्यांदा भोसरीत बैलगाडा शर्यत होणार आहे.