ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आळंदीकरांना होणा-या दुषित पाणीपुरवठ्याची गांभीर्याने दखल घ्यावी - महेश लांडगे

आळंदी, दि. ६ - गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र आळंदी देवाची आणि परिसरात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.  

आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात, श्री क्षेत्र आळंदी आणि परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषद प्रशासनाकडून पुरवठा केले जाणारे पाणी हे पिण्यासाठी योग्य नाहीच. इतर वापरासाठीही अयोग्य आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेतमहाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच, भाविकांची मोठी वर्दळ असते. आळंदी आणि परिसराला नगरपरिषद प्रशासनाकडून इंद्रायणी नदीवर असलेल्या बंधा-यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली, तळवडे आदी परिसरात असलेल्या विविध औद्योगिक कंपन्यांमधून रसायन मिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले जाते. तेच पाणी पुढे आळंदीकरांना पिण्यासाठी वापरात येते. रसायन मिश्रित द्रव्यांमुळे इंद्रायणी प्रदूषित झाली आहे, असा संताप आळंदीकरांनी व्यक्त केल्याचे नमूद केले आहे.

दुसरीकडे, आळंदीसाठी पुरविण्यात येणा-या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. पण, या प्रकल्पात अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रक्रिया होणारे पाणीसुद्धा अशुध्दच असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यास घातक असलेल्या पाण्याचाच नगरपरिषद प्रशासनाकडून पुरवठा होत आहे. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तांनी वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदीचा पाणीपुरवठा तात्काळ सक्षम करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडून लवकरच पाहणी

महेश लांडगे यांच्या निवेदनाला आयुक्त हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापालिका आयुक्त लवकरच महापालिका हद्दीतील चिखली, तळवडे आदी भागातून इंद्रायणी नदीची पाहणी करणार आहेत. त्याआधारे नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना Posted On: 06 May 2017