ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भोसरी येथे भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञाताचा मृत्यू

भोसरी, दि. १७ -  भोसरी येथे भरधाव गाडीने उडवल्यामुळे एक अज्ञाताचा मृत्यू झाला ही, घटना काल (दि.१६) रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी येथे घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटली नसून त्याला कोणत्या गाडीची धडक बसली हे देखील समजू शकले नाही.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ४५ वर्षीय अज्ञात इसम भरधाव वेगाने येणारे वहानाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान वायसीएममध्ये मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट , काळ्या रंगाची पँट परिधान केलेली आहे.  या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.