ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रस्त्याच्या मागणीसाठी आज बोपखेल बंद...

बोपखेल, दि. २३ - बोपखेल करांचा रस्ता बंद होऊनही दोन वर्ष उलटली मात्र, त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. यासंदर्भात बोपखेल करांनी उपोषणाला सुरुवात केली असून आज (मंगळवारी) उपोषणाचा तिसरा दिवस आहे. याच बरोबर आज (मंगळवारी ) बोपखेलकरांनी रस्त्याच्या मागणीसाठी बोपखेल बंद ची हाक दिली आहे.

राजकीय नेते प्रशासन यांनी आता तरी बोपखेलकरांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे यासाठी आज सकाळपासून बोपखेल बंद ठेण्यात आले आहे. बोपखेल गावाला त्यांचा हक्काचा रस्ता मिळावा यासाठी आत्तापर्यंत आंदोलन, उपोषण, बैठका सुरुच आहे. प्रशासान, राजकीय नेते आश्वासन देत आहेतच पण मार्ग निघताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी उपोषणाबरोबरच आत्ता बोपखेस बंद ही पुकारला आहे.बोपखेलकरांच्या उपोषणाला भेट देउन काल खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची समस्या जाणून घेतली.

बोपखेलकरांचा रस्ता मे २०१५ पासून संरक्षण विभागाने बंद केला आहे. त्यामुळे शाळा, नोकरी इतर दैनंदिन व्यवहारासाठी बोपखेलकरांना १५ ते १८ किमी चा वळसा घालून शहरात यावे लागते. रोजची वणवण कमी व्हावी यासाठी संरक्षण मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, नगरसेवक, महापालिका आयुक्त सर्वांकडे नागरिकांनी -हाणे मांडले आहे. मात्र त्याला अद्याप तरी यश मिळालेले नाही. पावसाळा तोंडावर आला तरी तात्पुर्ता तरंगता पुल तरी संरक्षण विभागाने द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.