ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बोपखेल ग्रामस्थांच्या उपोषणाला क्रांतीवर बिरसा मुंडा संघटनेचा पाठिंबा

बोपखेल, दि. २५ - हक्काचा रस्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या बोपखेलच्या ग्रामस्थांना क्रांतीवर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

बोपखेल गावचा रस्ता संरक्षण खात्याने कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) व्यवस्थापनाने बंद केला आहे. हा रस्ता बंद केल्यामुळे बोपखेलच्या नागरिकांचे हाल होत आहे. त्यांना पिंपरीत येण्यासाठी लांबून वळसा घालून यावा लागत आहे. हा रस्ता पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी बोपखेलच्या ग्रामस्थांनी मोठे आंदोलनही केले होते.

मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्याच्या आणि रस्त्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यात यावा या मागणीसाठी बोपखेलचे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्याच्या आणि रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यावा या मागणीसाठी बोपखेलचे ग्रामस्थ २१ मे पासून पिंपरीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांना बिरसा मुंडा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.