ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्यास परवानगी, ग्रामस्थांचे उपोषण मागे

बोपखेल, दि. २६ - बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्यास पुढील सहा महिन्यात परवानगी मिळणार आहे. पूल बांधण्यासाठी महापालिकेला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने संरक्षण विभागाला दिले आहे. त्यानंतर पुलाच्या मागणीसाठी पिंपरीत उपोषणाला बसलेल्या बोपखेलच्या ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

महापौर नितीन काळजे यांनी फळांचा रस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक श्याम लांडे, नगरसेवक सचिन चिखले, अमित गावडे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस फजल शेख, चेतन घुले, सह शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते.

हक्काचा रस्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बोपखेलचे ग्रामस्थ पिंपरी चौकात उपोषणाला बसले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याचे आवाहन केले. परंतु, लेखी पत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.

महापालिकेच्या अधिका-यांची आज (गुरुवारी) पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासोबत तात्पुरत्या पुलाबाबत बैठक झाली. मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे पत्र जिल्हाधिका-यांनी खडकी येथील स्टेशन हेडक्वॉर्टर, अॅम्युनेशन फॅक्टरी आणि डिफेन्स इस्टेट कार्यालयाला दिले आहे. 

तात्पुरता पूल बांधण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका पाच ते सहा महिन्यामध्ये पुलाचे काम पूर्ण करणार आहे.