ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्हावा - खासदार संभाजीराजे

भोसरी, दि. २९ - आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असून जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी समाज प्रबोधन झाले पाहिजे, असे विचार असलेल्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन, जून हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला हवा, अशी मागणी युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली.

महाराष्ट्र राज्य छावा क्रांतीवीर सेनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे काल शनिवारी (दि. २७) संपन्न झाले. त्यावेळी छत्रपती खासदार संभाजीराजे बोलत होते. यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग, प्रदेश संघटक नितीन दातीर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रकाश पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष राम घायतिडक पाटील, पुणे शहराध्यक्ष आरिफ सुभान शेख पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता पैठणपगार, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सागर भोसले, विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष राजू फाले, संघटनेचे २८ जिल्ह्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. बहुतांश मराठा समाज हा शेती करतो. आज शेतक-यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता ताराराणी, धर्मवीर संभाजीराजे भोसले यांनी महान कार्य आपल्या कार्यकाळात केले आहे. बहुजन समाजाला न्याय दिला, अशाच पद्धतीचे कार्य येथून पुढे आपण करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेले हे गडकोट महाराष्ट्र सरकारकडे संवर्धनासाठी हस्तांतरीत करावेत यासाठी केलेल्या पाठपुराव्याला Posted On: 29 May 2017